logo

HOME   महाराष्ट्र

विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपाची मैत्री घट्ट

भाजपाचे विश्वजीत डोंगरे, शैलजा सोनवाने तर काँग्रेसचे लता दोनोडे, रमेश अंबुले यांची जि.प. सभापतिपदी निवड

विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपाची मैत्री घट्ट

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेत आज विषय समितीची निवडणुक घेण्यात आली. यात कॉग्रेस-भाजपा युतीचे भाजपाचे घोटी जिल्हा परिषद क्षेत्राचे जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, शैलजा सोनवाने, कॉग्रेसचे रमेश अंबुले व लता दोनोडे ह्या निवडून आल्या. तेव्हा जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीतही भाजपा-कॉंगे्रसने आपली मैत्री घट्ट असल्याचा परिचय दिला.
या निवडणुकीतही काँग्रेसने राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी ‘आपण सख्खे वैरी सख्खे भाऊ’ चा नारा देत जुनीच मैत्री कायम ठेवली आहे. सभागृहात २० सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीला यावेळीही विरोधी बाकावर बसून भाजप-काँग्रेसचा संसार बघावा लागणार आहे. त्यातच काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले यांचे आज निधन झाल्याने काँग्रेसची संख्या १६ वरुन १५ वर आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या विषय समिती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विषय समितीच्या समाजकल्याण समिती सभापतीकरीता भाजपकडून विश्वजीत डोंगरे, राष्ट्रवादीकडून मनोज डोंगरे यांनी अर्ज दाखल केला होता. यात डोंगरेला ३१ तर मनोज डोंगरेला २० मते मिळाली. काँग्रेसने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेस-भाजप युती स्पष्ट दिसून येत होती. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून लता दोनोडे तर राष्ट्रवादीकडून दुर्गा तिराले यांनी अर्ज दाखल केले होता. यात लता दोनोडे यांना ३२ मते पळाली तर तिराले यांना २० मते मिळाली. यात भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरविला नाही. उरलेल्या दोन विषय समितीकरीता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून रमेश अंबुले यांनी तर भाजपकडून शैलजा सोनवाने यांनी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून किशोर तरोणे व राजेश भक्तवर्ती यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होता. यात रमेश अंबुले ३२ तर भाजपाच्या शैलजा सोनवाने यांना ३१ मते मिळाली.


Top