logo

HOME   लक्ष्यवेधी

आई मला शाळेला जायचंय जाऊ देणं व !

साखरा येथील एका चिमुकल्याचा आई समोर हट्ट निगरगट्ट प्रशासनाला कधी येणार जाग ? दुसऱ्या दिवशीही शाळेला कुलूप

आई  मला शाळेला जायचंय जाऊ देणं व  !

वरोरा (आशिष घुमे ):-   वरोरा तालुक्यातील जिल्हापरिषद उच्च  प्राथमिक शाळा साखरा(राजा ) येथील संतप्त गावकऱ्यांनी  काल शाळेला कुलूप ठोकले . आज शाळाबंद असल्याचा दुसरा दिवस असून . विद्यार्थ्यांना शाळेला लागली गोडी त्यांना शाळेत गेल्या विना राहवेना . पण करणार काय बिचारे जो पर्यंत शाळेची दुरुस्ती करणार नाही तो पर्यंत शाळेत जायचे नाही  अशी तंबी वडिलाने दिली . पण शाळेत  जाण्याची आतुरता त्यांना काही शांत बसू देत नाही . अशातच आई बाबाला सांगून मला शाळेला जायचं जाऊ देणं व!  असा हट्ट करतांना एक विद्यार्थी  दिसत होता .               एकीकडे मराठी शाळेतून विद्यार्थ्यांची गळती प्रशासनआणि शासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे . त्या करिता नवीन नवीन योजना आखल्या जात आहे . तशी प्रसिद्धी केल्या जात आहे . तर अनेक संघटना ही मराठी शाळा वाचवा म्हणत पुढे आलेल्या आहेत .  शहरांमध्ये मराठी शाळा वाचविण्यासाठी आणि टिकविण्यसाठी चळवळ उभी होत आहे . यात मात्र अपवाद ठरत आहे ती साखरा राजापूर शाळेतील पट संख्या . एकीकडे शाळा बंद होण्याच्या स्थितीत असतांना साखरा राजापूर शाळेतील ११५ विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवीत आहे . तसेच शाळेचे शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांची शिकविण्याची धम्माल पद्धत यामुळे असणारी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती लक्षणीय आहे . कदाचित त्यामुळेच विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली यात काही दुमत नाही . अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना येथील शिक्षण पद्धती बघून गावातच शिकविण्याचा निर्णय घेतला . येथील उपक्रमशील शिक्षक यांच्या मुळे शाळेला नवसंजीवनीच मिळाली आहे . पण खंत आहे ते निगरगट्ट प्रशासनाच्या भूमिकेची . एकदाचा दगडाला घाम फुटेल हो ! पण यांना नाही . 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे 'अशी काहीसी परिस्थिती असलेली वरोरा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष(?) अधिकारी आणि त्यांचा स्टॉफ वरोरा पंचायत समितीला लाभणे म्हणजे वरोरा तालुक्यातील जनतेचे अहोभाग्यच नाही का  . गेल्या  वर्षभरा पासून शाळेची इमारत जीर्ण झाली असून दुरुस्ती करता . शाळा व्यवस्थापन  समिती . सरपंच , पालक यांनी तगादा लावला असतांना ही . ते म्हणतात न 'सिधी उंगली से घी नही निकला तो उंगली तेढी करणी पडती है' . या हिंदी म्हणी प्रमाणे शेवटी गावकऱ्यांना शाळेला कुलूप ठोकून आंदोलन रूपी  उंगली  तेढी  करावीच लागली . पण आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून शाळेला कुलूप लागलेले आहे . तरी एकही अधिकारी (बातमी लिहितोत्सव )अजून पावेतो साखरा येथे पोहचले नसून आता पालक अधिकाऱ्यांची मारबत काढेल की काय ?  या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे . Top