logo

HOME   लक्ष्यवेधी

सांगा हो सर आम्ही बसायचे कुठे ?

साखरा येथील जि. प शाळेच्या चिमुकल्यांचा केविलवाणा प्रश्न शाळेला पाण्याची गळती ; संतप्त गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

सांगा हो सर आम्ही बसायचे कुठे ?

वरोरा(आशिष घुमे ) :- वरोरा तालुक्यातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा साखरा येथील संतप्त गावकऱ्यांनी आज शाळेला कुलूप लावल्याची  घटना समोर आली आहे . गेल्या अनेक वर्षांपासून शाळेच्या इमारतीचा प्रश्न शासनदरबारी प्रलंबित असून  जीव  मुठीत  घेऊन  विद्यार्थ्यांना  ज्ञानाचे  धडे  गिरवावे  लागत  आहे . कधी कुठली  घटना घडेल  याचा  नेम  नसतांना  चक्क   विद्यार्थ्यांच्या  जीवाशी  खेळणाऱ्या   प्रशासनाला  जागे  करण्यासाठी गावकऱ्यांनी शाळाबंद आंदोलन  रुपी शस्त्र हाती घेत शाळेला  कुलूप ठोकले .एकीकडे शासन `बेटी बचाव बेटी  पढाव ` म्हणत गाजावाजाकरीत आहे . लाखो रुपये जाहिरातींवर खर्च होत आहे . सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून १४ वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा आहे . विविध योजनांच्या घोषणा  पाऊस पडावा तशा  पडतांना दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थे असून अजूनही  साखरा सारख्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकावा लागत आहे . मराठी शाळेची घटती पट संख्या आणि शासनाचे नवीन धोरण यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे . पण साखरा सारख्या या ग्रामीण  भागातील शाळेत असणारे कर्तव्यदक्ष शिक्षक यांच्यामुळे शाळेला `नवसंजीवनी`आली खरी `पण साहेब नुसतं शिक्षण देऊन होत व्हय ! . सुविधा कोण देणार ? हा महत्वाचा  प्रश्न  पालकांना पडला असून . मुलांना शाळेत बसण्यासाठी हितभरही  जागा शिल्लक राहिलेली नाही जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी . ` पाणी च पाणी चहू कडे सांगा हो सर आम्ही बसावे कुठे!` असे म्हणत विद्यार्थी कधी उभे राहून तर कधी घरून आणलेल्या प्लास्टिकचा आधार घेऊन शिक्षणाचे धडे गिरवत आहे . शाळेतील  शिक्षकांच्या स्वभावामुळे आणि शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली . आपल्या पाल्यांना बाहेर शिकवायला पाठविणाऱ्या पालकांनी ही  आपल्या पाल्यांचे नाव गावातीलच शाळेत दाखल केले . त्यामुळे शाळेची पटसंख्या बरी असून . विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती लक्षणीय असते . एकीकडे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याकरिता शिक्षकांनी केलेला आटापिटा आणि दुसरी कडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधीचे  दुर्लक्ष यामुळे आता . करावे काय हा प्रश्न निर्माण झाल्याने बरेच दिवस पर्यायी व्यवस्था म्ह्णून गावातील मंदिरात तर कधी बाहेर शाळा भरवूनशिक्षकांनी  आपले कर्तव्य बजावले . हे पालकांनाही ठाऊक आहेतच . पण दगडाला घाम फुटेल पण प्रशासनाला  नाही अशी व्यवस्था  असणारी पंचायत समिती वरोरा  आणि तेथील अति `कर्तव्यदक्ष`(?) अधिकारी यांच्यामुळेच आज कुलूप लावत असल्याची प्रतिक्रिया देत . गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले . शाळेला कुलूप ठोकण्याची वेळच का यावी हा महत्वाचा प्रश्न असून या सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांचे शेक्षणिक नुकसान होते त्याला जबाबदार कोण?  प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळेला कुलूप लावतांना दिनेश मोहारे (सरपंच ग्रामपंचायत साखरा ) गोपाल काळे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष),मनोहर बावणे (तंटामुक्ती अध्यक्ष ), युवराज वेलेकर, विनायक खिरटकर , दीपक पिरके, मेघराज काकडे , मनोज उमरे , किसन काळे , भानुदास उमरे , विजय वांढरे, गुलाब गोडे , मोहन कावळे , प्रकाश जोशी , तसेच ईतर पालकवर्ग व गावकरी उपस्थित होते .तालुक्यात सर्व शिक्षाभियानाचा बट्याबोळ : जबाबदार कोण ? भेंडाळा येथील शिक्षकाच्या दारूडेपणाला कंटाळून गावकऱ्यांनी शाळेला ठोकले हे प्रकरण ताजे असतांनाच तालुक्यातील साखरा (राजा ) येथील गावकऱ्यांनी शाळेच्या दुरुस्तीची मागणी रेटून धरत  जो पर्यंत शाळादुरुस्ती साठी प्रशासन पुढाकार घेणार नाही तो पर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही अशी भूमिका घेतली आहे . या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे  . त्यामुळे तालुक्यात सर्व शिक्षाभियानाचा बट्याबोळ झाला असल्याची  चर्चा आता सुजाण नागरिक करतांना दिसत आहे तर . या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांना ज्या वयात शिक्षणाचे धडे गिरवायचे असते त्या वयात आंदोलन  कसे करावे हे शिकायला मिळत असेल आणि यामुळे त्यांचे शेक्षणिक नुकसान होत असेल तर याला जबाबदार कोण ?  हा प्रश्न उपस्थित होत आहे . सभापती मॅडम आश्वासनाच  काय ?०२ ऑगष्ट रोज शुक्रवारला पंचायत समिती सभापती रोहिणीताई देवतळे यांनी शाळेला भेट दिली .शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीची पाहणी केली .व त्यावरून बांधकाम विभागाचे अभियंता यांना शाळेच्या संपूर्ण इमारतीचे वॉटर प्रुफिंग, सर्व वर्गखोल्यांच्या छताची  दुरुस्ती , संपूर्ण शाळेची रंगरंगोटी , व सर्व वर्ग खोल्यांना स्टाईल्स लावण्यासाठीचे इस्टिमेट बनविण्याचे आदेश दिले . मात्र २६ दिवसाचा कालावधी लोटूनही लेखी अधिकारी किंवा कर्मचारी शाळेची पाहणी करायला न आल्याने व इस्टिमेट बाबत कुठलीच प्रोग्रेस न झाल्याने `ताई ` आपण दिलेले आश्वासन  इतर राजकीय नेत्यांसारखे नव्हते ना !  असे म्हणत सभापती मॅडम तुम्ही दिलेल्या आश्वासनाच काय ? असा प्रश्न आता गावकरी विचारात आहे .  Top