logo

HOME   लक्ष्यवेधी

अखेर रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणाय्राविरुद्ध उगारला कारवाईचा बडगा

मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांची धडक मोहिम अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले

अखेर रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणाय्राविरुद्ध उगारला कारवाईचा बडगा

देसाईगंज दि १४



                      वारंवार सुचना देऊन ही दररोज भरत असलेल्या दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या मैदानात सकाळच्या गुजरीत मनमानी करुन बाजारपेठ कंत्राटदाराला न जुमानता मुख्य रस्त्यावर आलु लसन कांद्याचा दुकान थाटुन वाहतूकीला अडथळा निर्माण करणाय्रा दुकानदारांवर देसाईगंज नगरपरीषदचे मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यानी आज सकाळीच कारवाईचा बडगा उगारुन रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणाय्राविरुद्ध तातडीने कारवाई  केल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबेदणाणले आहेत.  



                   देसाईगंज शहर हे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असुन मातावार्डातील दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या जागेवर दररोज आजुबाजुला शेतकरी शेतात काढत असलेल्या हिरव्या भाजीपाला ठोक दराने सकाळी सात ते साडे अकरा च्या सुमारापर्यंत विक्री केल्या जाते. या ठिकाणाहुन घेतलेला भाजीपाला आजुबाजुच्या ठिकाणी भरत असलेल्या आठवडी बाजारपेठ मध्ये विक्री केल्या जाते.



           परंतु, देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठ मध्ये आलु, लसन, कांद्याचा व अद्रक संदर्भात स्वतंत्र बाजारपेठ असतांना देखिल या ठिकाणचे काही व्यापारी दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या जागेवर आपला दुकान न थाटता, नगरपरीषद शॉपींग सेंटर बँकेकडे जाणाय्रा मुख्य वाहतूकीच्या मेनरोडवर रस्त्यावर अतिक्रमण करून सकाळी सात वाजता पासुन दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूकीला अडथळा करित असतात. या बाबत या परिसरातील जनतेनी सकाळी विद्यार्थांना ने -- आण करणाय्रा शाळेच्या बसेस व खाजगी वाहने काढतातच येत नसल्याने अनेकदा लेखी व मौखिक तक्रारी केल्या होत्या. या बाबत या मनमानी करणाय्रा व्यापाय्रांना वारंवार सुचना दिल्या  होत्या तरी याकडे दुर्लक्ष करुन अडेलतट्टुपणाने वागुन मनमानी व हेकेखोरपणा  करित होते. 



            नगर परिषद देसाईगंज तर्फे या अतिक्रमण करणाय्रा व्यापाय्रांवर कायदेशिर कारवाई करावी व दररोज वाहतूकीला निर्माण होत असलेला अडथळा दुर करुन परिसरातील जनतेला होणारा त्रास कमी करावा ही बाब देसाईगंज येथे नव्यानेच रुजु झालेले मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांच्या निदर्शनास आणुन देताच आज सकाळ पासुन मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांच्या नेतृत्वात नगरपरीषदची संपुर्ण टिम घटनास्थळी दाखल होऊन संपुर्ण अतिक्रमण काढुन टाकण्यात आले.या धडक मोहिमेमुळे शहरातील अतिक्रमणधारक चांगलेच हादरले असुन लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या आचारसंहितेतच  स्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे.



Top