logo

HOME   ताज्या बातम्या

बातम्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी - खा हेमंत गोडसे

म रा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार सन्मान पुरस्काराचे वितरण

बातम्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी - खा हेमंत गोडसे

नाशिक प्रतिनिधी 
              पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे,पत्रकारांनी समाजाच्या आणि नेत्यांच्या चुका दाखविल्याच पाहिजेत. मात्र समाजात केवळ नकारात्मक गोष्टीच घडत नसतात, तर समाजात अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात त्या पुढे आणल्या पाहिजेत. लोकमान्य टिळकांनी जी पत्रकारिता केली त्यातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार सन्मान पुरस्काराच्या वितरण समारंभात केले
            दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणार्‍या ४० पत्रकारांसह सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणार्‍या सामाजिक संस्थांचा पत्रकार सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सन्मानचिन्ह, शाल,पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे,पत्रकार संघाचे राज्यसरचिटणीस विश्वासराव आरोटे,महापौर सतीश कुलकर्णी,नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे,प्रभाग सभापती दिपक दातीर,लक्ष्मण सावजी,महेश हिरे, ज्येष्ठ पत्रकार पा.भा.करंजकर, , जिल्हा शहर अध्यक्ष दिलीप कोठावदे, सॅनसून इंडस्ट्रीजचे निशांत जाधव,लायन्स क्लबचे सतीश अलई, राहुल वेढणे,मनीष आहिरे,निखिल घोलप,जिल्हा निमंत्रक लक्ष्मण डोळस, प्रदेश सल्लागार प्रमोद दंडगव्हाळ ,तालुकाध्यक्ष जगदीश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जेष्ठ पत्रकार प्रियदर्शन टांकसाळे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी पत्रकारितक्षेत्रा बरोबरच सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
         यावेळी दिपक मोठे (आपलं महानगर), दिगंबर शहाणे (देशदूत), जयंत महाजन (लक्ष महाराष्ट्र), रमेश पडवळ (म.टा.), जिजा दवंडे (पुढारी), चारुशीला कुलकर्णी (लोकसत्ता), प्रदीप जगताप (दिव्यमराठी), नरेंद्र दंडगव्हाळ (लोकमत),  वसंत आव्हाड (पुण्यनगरी), दिपक भावसार (गावकरी), चंद्रकांत बर्वे (भ्रमर), संदिप पवार (सकाळ), ओंकार दळवी (दैनिक प्रभात जामखेड )श्याम तिवारी (अ.नगर), मुकुल कुलकर्णी


Top