logo

HOME   ताज्या बातम्या

महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यात आचारसहिता लागू

21 ऑक्टोम्बरला होणार मतदान 24 ऑक्टोंबर ला मतमोजनी

महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यात आचारसहिता लागू  


 सह्याद्रि न्यूज़ नेटवर्क :- अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून आज पासुनच आदर्श आचारसहिता लागू करण्यात आली आहे नवी दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्याचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे या नुसार महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात म्हणजेच 21 ऑक्टोम्बर ला निवडणूक होणार असून 24 ऑक्टोम्बर ला या दोन्ही राज्यात मतमोजनी होणार आहे पर्यायने दिवाळी पूर्वी या दोन्ही राज्यात नवे सरकार अस्तित्वात येणार आहे महाराष्ट्रात 288 जागांसाठी मतदान पार पडणार आहे तर हरियाणात 90 जागासाठी मतदान होणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 27 सप्टेम्बर ला निवडणूक अर्ज भरन्यास सुरुवात होवून 4 ऑक्टोम्बर ला अंतिम तारीख असून 5 ऑक्टोम्बर ला उमेदवारी अर्जाची तपासणी होवून 7 ऑक्टोम्बर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख असून या दोन्ही राज्यात 21 ऑक्टोम्बरला मतदान होवून 24 ऑक्टोम्बरला निवडणुकीची मतमोजनी होणार आहे.


Top