logo

HOME   ताज्या बातम्या

त्या निर्णयामुळे फडणवीसांची होऊ शकते दिल्ली वारी.

भाजपात खळबळ; मुख्यमंत्री पदाचा दावेदार शोध सुरू ? -सूत्र

त्या  निर्णयामुळे फडणवीसांची होऊ शकते दिल्ली वारी.

 मुंबई (विशेष प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे माझे शेवटचे वर्ष आहे असे विधान केले होते .ते आता सत्यात उतरण्याची वेळ आली असल्याची गुप्त माहिती सह्यन्द्रीच्या हाती लागली असून काल घेतलेल्या निर्णयामुळे मुख्यमंत्री पुन्हा एकदा चांगलेच वादात सापडले आहे .ऐन विधानसभेच्या तोंडावर हे कोणी केले असेल की या मागे काय राजकारण आहे .हे ओळखायला महाराष्ट्रातील जनता दुधखुळी तर नाहीस नाही .राजकारणातील प्रत्येक घडामोडी मागे काही दडलेले असते .हे आम्ही वाचकांना नेहमीच सांगत आलो आहो. आता या मागील ही ते गुपित आमच्या हाती लागले असून आपल्या समोर ठेवत आहो .
गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्रात शिवसेना - भाजपा युतीची सत्ता आहे पण सत्तेत असतांना शिवसेनेची विरोधी भूमिका ही भाजपा साठी चांगलीच डोकेदुखी ठरली असून आता मुख्यमंत्री पदा साठी शिवसेनाही आग्रही आहे .दुसऱ्यांदा बहुमतात सत्ता आल्याने भाजपाच्या दुसऱ्या गोटात ही विधानसभा निवडणूक भाजपने स्वतंत्र  लढावी असा सूर निघत आहे .त्या करिता कार्यकर्ते ही कामाला लागले आहे .पण मुख्यमंत्र्यांचा पक्षाअंतर्गत विरोध अजून चव्हाट्यावर आला नसला तरी मराठा किंवा ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळावं असे अनेकांना वाटत आहे .त्या करिताच हा सर्व प्लॅन  असून या बाबत लवकरच  काही नवीन घडामोडी घडण्याची शक्यता आहे .त्यामुळे अंतर्गत नवीन चेहरा शोध मोहीम सुरू झाली आहे .गेल्या दोन दिवसांपासून नेटकऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना चांगलेच धारेवर घेतल्या जात असून अंतर्गत विरोध ही वाढत आहे .तो निर्णय चुकीचा म्हणून अनेक कार्यकर्ते ही घरचा अहेर  देऊ लागले आहे.या बाबतचे सर्व रिपोर्ट  वरिष्ठ पदाधिकारी यांच्या पर्यंत पोहचले असून भाजपा मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरा घोषित करणार का हे येणारा काळच ठरवेल .

ते गुपित काय लवकरच नवीन लेखात वाचायला विसरू नका


Top