logo

HOME   ताज्या बातम्या

अशोक चव्हाण नांदेडमधून लढणार, काँग्रेसची आठवी यादी जाहीर

 अशोक चव्हाण नांदेडमधून लढणार, काँग्रेसची आठवी यादी जाहीर

नवी दिल्ली :-काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातून केवळ चव्हाण यांचेच नाव आहे.काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना कर्नाटकातील गुलबर्गा येथून तर, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्या पत्नी या जागेवरून निवडणूक लढतील, अशी चर्चा होती.परंतु, भाजपने अशोक चव्हाण यांचे कट्टर प्रतिस्पर्धी प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देऊन ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे काँग्रेसने कोणताही धोका न पत्करता खुद्द चव्हाण यांनाच पुन्हा येथून उतरवले आहे.Top