logo

HOME   ताज्या बातम्या

नौकरीच्या नावावर विद्यार्थ्यांची फसवणूक; प्रहार आक्रमक

विद्यार्थ्यांनी दिली वरोरा पोलीस स्टेशन ला तक्रार

नौकरीच्या नावावर विद्यार्थ्यांची फसवणूक; प्रहार आक्रमक वरोरा : चंद्रपूर - वर्धा जिल्हातील विद्यार्थ्यांना त्यांचा महाविद्यालयात जाऊन नौकरीचे आमिष दाखवून हजारो रुपयाची लूट केल्याचा प्रकार दि.24 ऑक्टोबर रोजी वरोरा येथे उघडीस आला असून याबाबत विद्यार्थ्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष तसेच आ.बच्चू कडू युवा विचार मंचाच्या नेतृत्वात वरोरा पोलीस स्टेशन ला फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी यासाठी निवेदन तसेच तक्रार देण्यात आली असून चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिसामार्फत देण्यात आले आहे.

वरोरा येथील वर्जिन आर्गेनिक व्हेजिटेबल प्रा लिमिटेड या कंपनीचे संचालकाने एक वर्षांपूर्वी वरोऱ्यातील आनंदनिकेतन कृषी तंत्रविद्यालय आनंदवन तथा हिंणगघाट येथील बिडकर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याबाबत प्रचार केला व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना विश्वासात घेऊन काही आजी व माजी विद्यार्थ्यांची मुलाखत हि घेण्यात आली यात त्यांना ४ महिने मोफत प्रशिक्षण व नंतर नौकरी असे बोलण्यात आले होते . मोफत प्रशिक्षण आणि नौकरी मिळणार या आशेने विद्यार्थ्यांनी आपले सर्व कागदपत्र घेऊन त्यांच्या वरोरा येथील कार्यालयात गेले असता सुरक्षा ठेव म्हणून प्रत्येकही ५ हजार देण्यास सांगतिले हि गोष्ट विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सांगितली . त्या नंतर हि बाब कंपनी संचालकाला माहित होताच ब्रेनवॉश करण्यासाठी परत त्यांच्या महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांना पैसे भरावयास लावले व ४ महिने प्रशिक्षण झाल्यांनतर विद्यार्थ्यांना अपाईंटमेन्ट लेटर देण्यात आले मात्र नौकरी मिळाली नाही काही महिने लोटल्या नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी आमदार बच्चू कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या शी संपर्क साधला त्यावरून बुधवारला जवळपास ५० विद्यार्थ्यांनी गजू कुबडे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन गाठले व त्यांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली त्याच सोबत प्रहार संघटना व आमदार बच्चू कडू युवा विचार मंचच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कथित कारवाई करावी या साठी हि निवेदन दिले यावेळी प्रहारचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे आ . बच्चू कडू युवा विचार मंचाचे संदीप झाडे , गणेश उराडे ,नितीन नागरकर,हर्षद धोके , प्रफुल गारघाटे , महेश पाटील , मयूर वाळके तथा अनेक प्रहार कार्यकर्ते व फसवणूक झालेले विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी पोलिसांनी योग्य चौकशी करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिली.मात्र या प्रकरणाची कसून चौकशी झाल्यास मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.


Top