logo

HOME   ताज्या बातम्या

खासदार रक्षाताई खडसे यांची शिष्टाई सफल ; उपोषण अखेर मागे

खासदार रक्षाताई खडसे यांची शिष्टाई सफल ; उपोषण अखेर मागे

भुसावळ :- प्रांताधिकारी यांच्या अखत्यारीत येणार्‍या सर्व्हे क्रमांक 59 ते 61 व 77 मध्ये निर्माण झालेला पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी या भागातील रहिवाशांनी बुधवारपासून आमरण उपोषण छेडले होते तर दुसर्‍या दिवशीही मागणी पूर्ण होण्यासाठी उपोषणार्थींनी उपोषण सुरूच ठेवले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास खासदार रक्षाताई खडसे यांनी उपोषणार्थींशी यशस्वी चर्चा केली. सुमारे 20 लाख रुपये खर्चून तात्पुरती पाणीपुरवठा योजना (टीपीडब्ल्यूएस) या भागात केली जाणार असून दोन दिवसात त्याबाबत प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचे आश्‍वासन खडसे यांनी दिल्यानंतर उपोषणार्थींनी उपोषण मागे घेतले. सदर प्रस्ताव प्रस्ताव उद्याच जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला जाईल असे प्रांतअधिकारी, तहसीलदार व् गटविकास अधिकारी यांनी चर्चा करुन निश्चित केले. खासदार रक्षाताई खडसे यांनी या प्रस्तावाबाबत स्वतः लक्ष घालून दोन महिन्याच्या आत पिण्याचे पाणी लोकांपर्यंत पोहोचेल असा शब्द दिला. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता पी.एस.लोखंडे, गटविकास अधिकारी एस.बी.मावळे, भाजपा सरचिटणीस डॉ. सुनील नेवे, सौ. रजनी संजय सावकारे, सौ प्रीती मुरलीधर पाटील, माजी पंस उपसभापती मुरलीधर पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हेाते.



Top