logo

HOME   संस्कृती

सौ.भारती राजू लखमापुरे विलोडा पं.स.भद्रावती, जि-चद्रंपूर. भ्र.ध्व.९९२३५४२७२०

'पोळा'हा सण लहानांपासुन ते थोंरा मोठ्या पर्यंत सर्वांनाच आवडणारा सण आहे.विशेषतः हा सण खेडेगावामध्ये जास्तीत जास्त आनंदाने,उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो.या दिवशी शेतात आपल्या बरोबरच राबणा-या बैलांसाठी खास दिवस असतो.शेतकऱ्यांच्या या सणाला विशेष महत्त्व आहे.या दिवशी बैलांचा थाट न्याराच असतो. बैलाला आराम असतो.शेतीच्या कामाला किंवा बैलगाडीलापण जुंपल्या जात नाही.         "पोळा" हा सण श्रावण अमावस्या या तीथीला येणारा बैलांचा सण आहे.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे.ज्यांच्याकडे शेती नाही.ते पण मातीच्या बैलाची पुजा करतात.           नागपंचमी,नारळीपोर्णीमा,रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणातपिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.असा सर्जा राजाचा सण म्हणजे 'पोळा' हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण  '(आवतण) ' 'आज आवतण घे उद्या जेवाले ये'...!'* असे आमंत्रण दिले जाते.पोळ्याला त्यांना नदीवर,ओढ्यावर किंवा तलावावर नेऊन आंघोळ घालतात.या दिवशी बैलाच्याखांद्याला (मान जिथे जोडली असते तो भाग) हळद तेलानेशेकतात.याला ' खांद शेकने' म्हणतात.         त्या दिवशी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलाचासाजश्रुंगार शेतकरी करतो त्यांच्या पाठीवर नक्षिकाम केलेली झूल,सर्वांगावर गेरूचे किंवा रंगाचे ठिपके,शिंगाला बेगड,डोक्याला बेलाच्या पानांचे बांशीग,गळ्यात कवड्याच्या माळा व घुंगराच्यामाळा,नवी वेसन,नवा कासरा घालतात.त्याला खायला गोड पुरणपोळी देतात.बैलाच्या निगा राखणा-या घरगड्यास नवीन कपडे व 'बोजारा' देण्यात येतो.          गावाच्या आखरावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते.त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या,वाजंत्री,सनया,ढोल,ताशे वाजवत एकत्र येतात आणल्या जातात.त्यानंतर 'मानवाईक'व्यक्ती च्या जोडीद्वारे तोरण तोडले जाते. व पोळा त्यानंतर फुटतो.प्रत्येक भागातील पद्धत वेगळी असते.काही भागांत प्रथम बैलजोडी नेण्यासाठी 'बोली' लावली जाते.ज्यांची 'बोली' जास्तत्यांना सर्वप्रथम बैलजोडी नेण्याचा मान असतो.आलेली रक्कम गावाच्या विकासासाठीलावली जाते.पोळा फुटल्यानंतर ती पहीली जोडी, आधी 'मारुतीच्या देवळात' जाते.व नंतर त्या बैलजोडीला घरी आणून त्यांची पुजा करून त्या दिवशी "कुड्याच्या" पानांत 'पुरणपोळी' चानैवेद्य बैलाला दिला जातो.          खेडेगावात तर पोळा फुटल्यानंतर बैलाची पुजा झाल्यावर खूप धम्माल मजा येते.लहान थोर माणसं एकमेकांच्या घरी जातात.लहान मंडळी मोठ्ंयाच्या अक्षता लावून पाया पडतात.व मोठी मंडळी त्यांना आशिर्वाद देऊन,घेऊन यथाशक्ती भेटवस्तु देतात.त्याला 'बोजारा'असे म्हणतात.पोळ्याच्या दुसऱ्या दिवसाला व-हाडात "कर"म्हणतात तर झाडीपट्टीत त्याला "बडगा"म्हणतात.या दिवशी झाडीपट्टी व.        व-हाडात अबालवृद्धांसह छोटे चिमुकले 'झेंडीमुंडी' खेळतात.लोक साखरझोपेत असतांना "मारबत" काढली जाते."माशा मुरकुटे घेऊन जा गे मारबत " असे स्तवण करून मारबत काढली जाते.म्हणजे या पावसाळ्यात माशा,मुरकुटे,डांस यामुळे अनेक रोग पळून निरोगी जीवनाची मागणी यानिमित्ताने मागली जाते. असा हा पोळा सण आनंदाची,उत्साहाची उधळण घेऊन येतो.     या सणाचा मतितार्थ हाच की,कृषी संस्कृतीचं सन्मानपुर्वक जतन आणि कृतज्ञता व्यक्त करणे, समाजातील वाईट प्रवृत्तीचा नाश करून,चांगल्या प्रवृत्ती समाजात वृद्धिंगत व्हाव्या.या सणाचे निमित्ताने समाजाला संबोधन केले जाते.व ती जबाबदारी प्रत्तेकाने  स्वीकारली पाहीजे. आपल्या शेतकरी बांधवाच्या उत्साहात प्रत्तेकाने सामिल व्हावेशेवटी म्हणावे... "आली श्रावण अमावस्या,घेऊन बैलपोळा सणाला,बळीराजा आनंदाने,सजवितो आपल्या, सर्जाराजाला.....!      बैलपोळा सणाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा  Top