logo

HOME   मुख्य बातमी

अखेर माजी मंत्री संजय देवतळे यांनी बांधले शिवबंधन

वरोरा विधानसभा क्षेत्रातून लढणार निवडणूक

अखेर माजी मंत्री संजय  देवतळे यांनी बांधले शिवबंधन

मुंबई : भाजप नेते तथा माजी मंत्री संजय देवतळे यांनी आज  शिवसेनेत प्रवेश घेतला असून मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलेे आहे.  ते वरोरा  - भद्रावती विधानसभा क्षेत्रातून शिवसेने कडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजप कडून लढले होते मात्र अवघ्या २ हजार मतांनी शिवसेना उमेदवार बाळू धानोरकर यांनी पराभूत केला होते.लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी शिवबंधन तोडून काँग्रेस कडून निवडणूक लढवत खासदार म्हणून निवडून आले. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप व शिवसेना या दोघांमध्ये युती झाली असल्याने वरोरा - भद्रावती मतदार संघ हा शिवसेनेसाठी राखीव आहे. त्यामुळे काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेले संजय देवतळे मोठे गोच्यात सापडले होते.  अखेर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचे ठरविले होते आज शिवबंधन बांधून शिवसेना प्रवेश निश्चित केला आहे. वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रातून त्यांना  उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीने शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची लाट आहे. तर देवतळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.Top